Monday, March 14, 2016

तो क्षिप्रेवरचा जूना पूल....




ब्रिटीश शासनात
जन्मलेला एक भक्कम
काळ्या दगडांचा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल...

दात पडून
गालावर पडलेले खड्डे
हसताना
तो आता लपवत नाही
वार्धक्यामुळे
पडलेल्या सुरकुत्याही
अकारण चिंता करुन
ताणत नाही...

तो उगवणारा दिनमणी
संथपणे वाहणारी नदी
अस्तंगत असलेला भास्कर
समोरच्या पूलावरुन
निरर्थक सकाळ ते संध्याकाळ
धावणारे जीवन
खुणवणारा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
पथिकांकडे टोल
मागत नाही...

एकेकाळी तोही नि:श्रांत धावत
असणारा
आता शांत उभा
त्याला कटवून जाणाऱ्या
नातलगांची तमा
बाळगत नाही...

जमीनदोस्त होण्या आधी
जमीनीवर पडून
पायाच्या पंज्यावरती
नातवाला बसवून
ठो दे ठो दे म्हणत
त्या टोकापासून ह्या टोकाला
नेणारा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
क्षिप्रामाई जवळ
आता गाऱ्हाणे गात नाही...

कारण
हे उत्तरायण संपता
अलगद सामावून घेइल
कुशीत त्याला
क्षिप्रामाई
पोटच्या पोरा सारखं
आपच
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
आनंद लूटत लूटवत
आता कसले ही फड ठेवत नाही....



...........चेतन पद्माकर फडणीस, देवास, १७.२.२०१६

संस्कार, बदलते परिणाम...



कागदावर पहिला शब्द उमटला आणि माझा जन्म झाला. माझ्या सुज्ञ पित्याने विद्वान पण्डितांकडून माझी जन्मपत्रिका काढवली असेलच, तसेच जन्माच्या वेळी असलेले ग्रह-नक्षत्र पाहुन माझे नाव ही ठेवण्यात आले असतिल. ’संस्कार ब. परिणाम’ हे माझे पूर्ण नाव. पित्याचे नाव श्रीयुत "बदलते"! जरी थोडे हास्यास्पद असले, तरी काळानुरुप माणसावर त्याच्या जीवनखण्डात झालेले संस्कार हे केवळ जग बदलत चालले आहेत म्हणून बदलावे ही मनीषा नाही, असोत. जाति ’निबंध’, गोत्र ’मुक्तछंद’ आणि आडनावाला धरुनच वाचकाच्या मनावर खोचक परिणामकारक ठरणे हाच श्रेयसकर धर्म. हा माझा संक्षिप्त परिचय. माझा मलाच होणारा उपयोग, बहुधा त्रास ही, माझ्यामुळे अनेकांच्या आयुष्यात घडणारे बदल, मी नसल्याने जीवनातले व्याप-व्याधी, असल्याचे महिमान-कोडकौतुक , सद्यःस्थिती आणि त्यातून उत्पन्न मनाला विषण्ण करणारी, विभत्स वैफल्यै.  थोडक्यात संस्कारी व असंस्कारी दोनी बाजूंचा उलगडा करत करत मी माझा जीवनप्रवास तो उपसंहारास पोहोचवून, माझ्यावर शेवटचा संस्कार होण्यापूर्वी ह्या सचेत-सदेह आणि माझ्या आयुष्याचा मी स्वतः प्रस्तावक ह्या भूमिकेतूनही, वाचकमनाला जाऊन थेट भिडणे, तसेच त्याच्यावर आपले संस्कार करूनच, ठेवलेला कागबली गिळू देइन..    

संस्काराची एक ओंगळ परिभाषा म्हणजे "चांगला मुलगा", (मुलगीही), पण थोडे गहन अर्थ पाहिलेत तर संस्कार हे सार्थक जीवन जगणे, इतकेच नाहीततर आयुष्य सुंदर पध्दतीने जगायचे असलेत तर संपूर्ण जीवनचक्रात पावलो-पावली अवती-भवती असलेल्या छोट्या-लहान सर्वगोष्टीतून लाभलेले त्या-त्या गोष्टीतले श्रेष्ठ गुण आपल्या जगण्यात वागण्यात ग्रहण करत जाणे असा होतो. अबोध बालमनावर त्याच्या जन्मापासून तो जे काही पाहतो-ऐकतो ग्रहण करतो, मग ते त्याच्या आईकडून, पित्याकडून, आजी-आजोबांकडून विशेष ,घरातल्या इतर मोठ्या व्यक्तिंकडून, शेजार-पाजारहून, शाळेतून आणि अगदी आपल्या लहान सवंगड्यांकडूनही, त्याचा एक दाट कधीही फिका न पडणारा ठसा उमटत जातो, जो त्याच्या संपूर्ण आयुष्यात तो पुढे समाजात वावरताना, कसा मुलगा?, भाऊ?, शिष्य?, मित्र?, पति?, पीता? नागरिक? थोडक्यात माणूस? हे ठरवतो. मनुष्य ह्या प्राण्याला माणसात आणन्याचे कार्य हे त्याच्यावर झालेले संस्कारच करतात. मनुष्यातले संस्कारच त्याला कळसास पोहोचवतात तर तसेच रसातळाला नेण्यासाठीही कारणीभूत ठरतात.

जीवन जगण्यासाठी एक पध्दत आपल्या पूर्वजांनी सांगितली आहेत, त्यात काळाप्रमाणे आवश्यक ते बदल हे गरजेचे आहेतच, पण त्या-त्या जीवनपध्दतीचे वैशीष्ट्य जपणे ही आपलेच कर्तव्य आहे. संस्कॄति आणि संस्कार हेच माणसाची ओळख असते, तेव्हा "काळाची गरज" ह्या पाटी खाली मनमर्जीपणे सारे टाकत जाणे हे सर्वस्वी अस्विकार्य आहेत. संस्कृति जपली तर त संस्कार येतील, संस्कृतिच नाही तर संस्कार कसे राहतिल. अलीकडे माता-पिता रोजच्या कलागतित एवढे रममाण झालेले असता येणाऱ्या पिढ्या घडविण्याचे कार्य हे खूप मागे राहुन गेले आहे. देशात लोकसंख्या तर उमाप वाढत चालली आहेत, पण त्यात माणूस कितीसे आहेत? हा प्रश्न मनाला विषण्ण करतो. माता-पिता कर्तव्यमूढ होत चाललेले आहेत ह्यात तिळभर शंका नाही. पैश्याने संस्कार विकत घेता आले असते तर मोठ-मोठे पैसेवाले लोक वृध्दापकाळी आसरा शोधत फिरताना आढळले नसते, ते त्यांच्या तरुणाईत कर्तव्यासी मूकले, आणि म्हणूनच हे परिणाम.

कधी-कधी माला स्वतःला ही वाटतं मी इतका संस्कारी राहुन काय मिळविले? माझ्या मित्रांच्या यादीमधे नेहमी "संतोष-प्रिती" ही गरीब घरची संस्कारीत मण्डलीच सामिल असायची! ते थोडे शीष्ट श्रीमंत लोक "यश-किर्ती" आमच्यासारख्यांकडे डुंकून ही कधी पाहत नसे. अच्छा नकोत पण त्यांच्यातला उर्मटपणा त्यांना कधीच वक्री गेला नाही, आम्ही जरा कुठे मनासारखं वागायचं नुसते ठरवताच तोण्डघाशी पडलोत. जे नियमांना धरुन चालतात त्यांचेच हाल का? हे कोडे आजतागायत सुटलेले नाही आहे. पण ज्यांनी कधीच ही संस्कारांची चौखट स्विकारली नाही, तेच अधिक सुखी, पाहुन मनात जर एकेकाळी असुया उत्पन्न होत असली, तरीही आजवरचे जीवन आणि झालेले संस्कार वायाच गेले!! नाही का..?? संस्कारांचे महत्व एवढ्याचसाठी आहेत कि ते माणसाला पशुवॄत्ति कडे जाण्यापासून परावृत्त करुन जीवनाच्या महत्वांच्या वळणावरती जीवाचे मार्गदर्शन करतात. ॠषी-मुनिंच्या सहस्त्र वर्षांच्या उपासनेचा सार हेच "संस्कार" रुपात आपल्या पावतो पोहोचले आहेत, आणि ते पुढल्या पिढी पावतो पोहोचविण्याचे कार्य वर्तमान पिढीने जिद्दीने करावेच. संपूर्णपणे ही नियोजित जीवनशैली नाकारणे असला मुर्खपणा करण्याचा अट्टाहास बाळगणारे वेळेआधीच सावध झाले तर मिळवलं.

’संस्कार’ ह्या अग्निहोत्रात प्रथम आहुतिचा मान ’संसार’ ह्या पवित्र यज्ञमण्डपाची अधिष्ठधात्री देवी आदिशक्तिचा आहेत. सामान्य मातीला आकारुन त्यातून विभिन्न कला-कौशल्याने परिपूर्ण असलेलं व्यक्तिमत्व घडविण्याचे कार्य "आई" हीच करु शकते, नाहीततर जगात प्रल्हाद, राम, शीवबा, विवेकानन्द , तिळक आणि असंख्य हे जन्मले तर असतेच पण जनमानसापावतो पोहचले नसते. प्रत्येकाचीच आई, आईपण जाणवताच आपल्या कर्तव्याचे पालन जिद्दीने करत असते, पण आम्ही-तुम्ही सामान्य लोक ती तिच्यातली जिद्द आपल्या आयुष्यात ह्या संसाररुपी मायाजाळात अडकून टिकवून ठेवत नाही आणि म्हणूनच ’सामान्यच’ ठरतो!

पाळण्यातले संस्कार झाले काय नाही काय एकच, तरी जाणत्यावयीचे मुंज-लग्न आणि अंत्यविधी सुध्दा फक्त दिखावा बनून राहिले आहेत, त्याचा उपयोग हा कवडीचा ही नाही. मुंज झालेले कितीसे मुलं त्रिकाळ संध्या करतात? त्यांना संध्या काय हे तरी महिती आहेत का? हाच प्रश्न आधी. लग्नमण्डपी स्वखुषीने सावधान झालेले गाजा-बाज्यासह कोर्टाची पायरी चढताना ही दिसतातच! अंत्यविधी ही तेवढी आपल्या हातात नाही! तरी ती का? कश्यासाठी जरुरी आहेत हे तरी आम्ही जाण्यापूर्वी सांगितली होती का? आम्हालाच कुठे माहिती त्याबद्दल! आणि म्हणूनच ह्या जगात लोकसंख्या वाढतीये कारण मुक्तीचे मार्ग कुणालाच सापडत नाहीये, येर-झारा तो चालूच आहे आणि चालूच राहणार! म्हणून स्वतःच्याच मुक्ततेचा विचार करता संस्कार जतन करा..

एक अजुन नुसतेच मुलं नाही मुलींनाही नियमाने वागायला शिकवा, त्यांना सीतामाईचे, झाशीच्या राणीचे-बहिणाबाई, अहिल्याबाई होळकर, ह्या सारख्या असंख्य स्त्रीयांचे आदर्श शिकवा. इंदिरा संत-शांता शेळके ह्यांच्या कवितेची गोडी लावा. मुलांना तर पुष्कळ ठिकाणी आजही संस्कार ह्या बेडीने बांधून ठेवले आहेत, मुलीही बांधा. जगात वायुवेगाने पसरत चाललेली अस्थिरता कुठेतरी थांबवायची असली तर मुलींना आवरा! हे मी चांगल्या हेतुनेच बोलतोय, त्याचा सारासार विचार न करता, माझ्या दारावर जगभर असलेले स्त्रीमुक्ति संगठणं हातात काळ्या पाट्या घेऊन एकत्रीत होण्याची गरज नाही. एकत्रीत व्हायचेच असले तर "संस्कार-जतन करण्याच्या" हेतूने व्हा. तीच काळाची गरज आहे. उघड्या डोळ्याने दिसणारे आणि अंतरचक्षूंनी दिसणारे परिणाम ह्यांना सुंदर वळण देण्याचे सामर्थ्य हे तुमच्यातच आहे. पुरुषांना ते जमेल हे वाटत नाही. किंबहुना प्रकृति-पुरुष मिलन नवे संस्कार घडवतिल.

मनुष्याचे जीवन हे अकल्पित आहेत. जन्म आणि मॄत्युवर त्याचा अधिकार नाही, हो पण ह्या दोन टोकांमधला कालखण्ड हा सर्वस्वी त्याच्याच स्वाधीन आहेत, त्याच्या अधिकारक्षेत्रात येतो. म्हणून निर्णय सावधपणे आणि कलाकुसरीने घ्या, जेणेकरुन नुसतेच तुमचे नाहीत तर तुमच्या अवती-भवती असलेल्यांचेही आयुष्य सुंदर वळण घेतील. एक-एक मिळूनच अवघे विश्व सुंदर होतील, उन्नत होतील. फिरत्या चाकावरची माती ही सुंदर आकार आपच घेत नाही! एक अदृष्य कलाकार त्याही मागे असतोच असतो. ’संस्कार’ जीवनाला सुंदर आकार देणारे तेच अदॄष्य हात आहेत...


...........चेतन पद्माकर फडणीस, देवास

Make a Call…



They say world is
Now over fingertips
Still there is hell
Distance between you-n-me…

Yet to be travelled
To be explored
To be walked together
Though crossed many a times…

We had an eye-contact
We had a shake hands
Exchanged business cards
Hearts still in waiting….

Oh! Your sweet voice
Soothing sound
Crispy as well
Though it’s a year…

I haven’t heard
Anything from you
Not a single word
In recent past….

That last phone call
Ended in seconds
Still it seems
You just whispered in my ears…

Mine all route
Are accessible
That You too know
Just make a Call….

~~~~~~Chetan.












नया मोबा‌ईल (३जी/४जी हैण्डसॅट) साढेतीन मे से एक दशहरे के शुभ-महुरत मे घर आया तब से अबतक केवल गाने सुनने के अलावा को‌ई काम नही आ रहा! न‌ई टॅक्नोलॉजी के साथ अडजस्ट और पुरानी को हमेशा के लिये अलविदा कहना इतना आसान कहा जनाब. हम तो यू भी दिल से सोचनेवाले लोगो मे से है...

पर पिछले पाच दिनो मे ऐसा लग रहा है मानो मोबा‌ईल तो एक बहाना होगया, हम जो कही समय के साथ पुराने और आ‌ऊटडेटेड होते जा रहे थे, हमे अपने आप को दोबारा with certain modifications relaunch करने का मौका मिल गया हो. क‌ई सारी चिजे जानी, क‌ई चिजे जो हमे लगता था हम जानते थे, वे भी न‌ईसी लगी.

यू तो स्मार्टफोन २०१३ से प्रयोग मे ले रहे है पर स्वयं को "स्मार्ट लोगो कि फहरिस्त मे गिनने वाले" हम, और हमारा इसी बात का अहंकार दशहरे पर आया मेहमान तोड गया. सिम "मा‌ईक्रो और नेनो" हो ग‌ई थी और हम आजतलक "सेंटी" होये बैठे थे. मेरा पुराना मोबा‌ईल और उससे जुडी यादे! एक-एक कर डिलीट करते समय लग रहा था मानो दिलपर को‌ई बडी बेरहमी से आरी चला रहा हो. क‌ई सारी तसविरे (केमेरा २MP का ही था) जो आप ने मेरे इसी फेसबुक अका‌ऊंट पर ला‌ईक कि थी कभी उन्हे पिसी पर ट्रासफर किया, कुछ (अप्रकाशीत!) डिलीट की, डाटा बेकॅप लिया, क‌ई नंबर(zombies) जिनसे सदियोसे काम नही पडा (उन्हे भी और मुझे भी) सब कुडेदान मे डाले (उतना ही स्वच्छता अभियान मे मेरा योगदान) . पुराने मोबा‌ईल से नया क‌ई मा‌ईनो मे बेहतर है लेकिन फिर भी अभी "वह नया है".

मित्रो इसी पुराने मोबा‌ईल पर ’मेरी-उसकी’ घंटो बाते हु‌आ करती थी, और मेरे पहले लिखित ब्रेक-अप का साक्षीदार भी यही मोबा‌ईल बना था. जो आजतक एक सच्चे दोस्त कि भाति मेरे साथ हर घडी मे खडा रहा, जिस पर क‌ई बार उसकी गलती ना होते हुये भी मै पागलो कि तरह चिल्लाया था, और जिसने कभी मुझसे कुछ नही मांगा (स्क्रीन गार्ड खराब हुये सालो बीत गये थे, क‌ई दफा गिरने-पडने कि वजह से आ‌ई हु‌ई चोटे भी वो चुपचाप सहता रहता) अपने आखिरी दिनो मे बार-बार (hang) दर्द से कहराता वो मेरी न‌ई सेटिंग ना बिगडे इसलिये मौत से लडते हुये आखिरकार (मेरे नागवारे रवयै को देखते हुये)मेरे लिये अपनी जान दे गया (इंसानी फितरत ही फायदा देखती है....कमीना! अब उस (e-waste) ठिकरे का क्या करु? ओ-एल-एक्स पर भी नही बिक रहा).....! और उसकी दशा-दीशा ऐसी बिगडी है कि दिवारपर दादाजी की तसवीर के बगल मे उसकी सेल्फी भी नही टांग सकता. वक्त रहते अगर मै उसका दर्द समझता काश, तो आज मुझे जो शुभमहुरत मे हजारो का फटका पडा है उससे बच जाता...!

खेर जो होता है अच्छे के लिये हि होता है. To ensure you see the latest version you need to clear the cache memory, और ये होता है by doing a force refresh (क्रमशः) by pressing both control (पीताजी) and F5 (माताजी) buttons simultaneously. बडा हलका महसूस कर रहे है, केवल 110 ग्राम का यह नया मोबा‌ईल दिखने मे और सुनने मे फिलहाल तो न‌ईवाली गर्लफ्रेण्ड को भी पिछे छोडता हु‌आ नजर आ रहा है (वो मुझे इसके लिये अलग से सुनायेगी ही). आनला‌ईन (बकायदा रिसर्च कर) खरीदा हु‌आ यह मोबा‌ईल कितना साथ निभाता है यह तो वक्त ही बतायेगा...

बहरहाल अपनी आरामगाह से निकलने (सिम एक्टीवेशन का इंतजार! २जी प्लान और ४जी फोन...कागदी प्रक्रिया आजभी देश मे ०.५जी कि गती से होती है) का इंतजार कर रहा है.


विशेष नोट: मोबा‌ईल धारक पर पिछले सात सालो मे किसी का एक भी रुपया बकाया नही होने के कारण आजभी नंबर वही है....!    

विशेष सूचना: मोबा‌ईल सम्बंधित को‌ई भी जानकारी* (कम्पनी/अथवा स्पेसीफिकेशन्स) यहा नही दी जावेगी.

आप चाहे तो अपने बधा‌ई संदेश इस लम्बी टू-टू के बाद छोड सकते है (पढकर "ला‌ईक" "मार्क" करने पर फेसबुक या Mr. Zuckerberg आपसे को‌ई अतिरिक्त चार्ज नही करेंगे)

धन्यवाद...!  

(Copyright: चेतन फडणीस)